Covid-19 आणि आयुर्वेद
2020 वर्षामध्ये जगभरात आलेल्या covid19 च्या साथीमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाले होते. भारतात झालेल्या लॉकडाउन मूळे अनेकांचे उद्योगधंदे, नोकऱ्या, भविष्यातील योजना जणू काही काळासाठी pause झाल्या आणि corona virus ची भीती सतावू लागली. सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं तर माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये इतका व्यस्त झाला होता की सगळ्या गोष्टी कशा instant झाल्या पाहिजे कारण वेळही अपुरा पडत होता. पण corona virus च्या निमित्ताने जे काही लाभले ते बहुमोलाचे होते. असो तर मुद्दा हा आहे की या काळामध्ये आपण पाहिले की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर कंपन्यानी आपले products बाजारात आणले. पण कमी कालावधीत रोगप्रतिकार शक्ती अशी वाढणार नाही त्यासाठी नियमितता आणि सातत्य हवे आणि सोबत आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे काही मूल्यांचे संगोपनही झाले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्येच्या अगदी विरुद्ध आपली जीवनपद्धती झाली आहे. Seasonal मिळणारी फळे भाज्या आता 12 महिने मिळू लागल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाल्यावर कीड लागू नये , जास्त प्रमाणात उत्पन्न यावं म्हणून वापरले जा...