Posts

Showing posts from May, 2021

अभ्यंगाचे फायदे

Image
  अभ्यंग 'अभ्यंगस्नान' हे बहुतकरून दिवाळीमध्ये केले जाणारे आणि एक सणाचा भाग म्हणून राहिले आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये 'अभ्यंगा' चे अगाध महत्व वर्णन केले आहे. अभ्यंग हे शारिरीक आणि मानसिक ऊर्जा संतुलित राखते. रक्ताभिसरण सुधारते. 'अभ्यंग' म्हणजे विशिष्ट तेल सुकोष्ण करून शरीराची मालिश करणे. ही प्रक्रिया एका विशिष्ट लयीमध्ये आणि वेळेमध्ये होणे गरजेचे आहे.   अभ्यंगाचे फायदे – अभ्यंगमचरेन्नित्यम् स जराश्रमवातहा।।७।। दृष्टिप्रसादपुष्ट्यायु: स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्यकृत।। वा. सु. २/७   अभ्यंगामुळे वार्धक्य रोखले जाते, त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर काढले जाऊन त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होते. शरीराला किंबहुना मांसपेशींना पुष्टी मिळते. ज्यांचे वजन कमी आहे किंवा बरेच उपाय करूनही वजन वाढत नाही त्यांनी नियमित अभ्यंग करावा. अभ्यंग आयुष्य वाढवतो. दृष्टी स्वच्छ करतो, निद्रा देतो, शरीर दृढ करतो तसेच शारीरिक आणि मानसिक आघात सहन करण्याची ताकद देतो. जुनाट सर्दी पडसे असेल तर अभ्यंग खूप छान फायदा करतो.   अभ्यंग कधी करावे? आरोग्य अबाधित राखण्यासाठी अभ्यंग नियमित कराव...