अभ्यंगाचे फायदे

 

अभ्यंग

'अभ्यंगस्नान' हे बहुतकरून दिवाळीमध्ये केले जाणारे आणि एक सणाचा भाग म्हणून राहिले आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये 'अभ्यंगा' चे अगाध महत्व वर्णन केले आहे. अभ्यंग हे शारिरीक आणि मानसिक ऊर्जा संतुलित राखते. रक्ताभिसरण सुधारते. 'अभ्यंग' म्हणजे विशिष्ट तेल सुकोष्ण करून शरीराची मालिश करणे. ही प्रक्रिया एका विशिष्ट लयीमध्ये आणि वेळेमध्ये होणे गरजेचे आहे.



 

अभ्यंगाचे फायदे –

अभ्यंगमचरेन्नित्यम् स जराश्रमवातहा।।७।।

दृष्टिप्रसादपुष्ट्यायु: स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्यकृत।।

वा. सु. २/७

 

अभ्यंगामुळे वार्धक्य रोखले जाते, त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर काढले जाऊन त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होते. शरीराला किंबहुना मांसपेशींना पुष्टी मिळते. ज्यांचे वजन कमी आहे किंवा बरेच उपाय करूनही वजन वाढत नाही त्यांनी नियमित अभ्यंग करावा. अभ्यंग आयुष्य वाढवतो. दृष्टी स्वच्छ करतो, निद्रा देतो, शरीर दृढ करतो तसेच शारीरिक आणि मानसिक आघात सहन करण्याची ताकद देतो. जुनाट सर्दी पडसे असेल तर अभ्यंग खूप छान फायदा करतो.

 

अभ्यंग कधी करावे?

आरोग्य अबाधित राखण्यासाठी अभ्यंग नियमित करावे.

विशेषतः हेमंत ऋतु किंवा थंडीच्या दिवसांत अभ्यंग खूप लाभदायी ठरतो.

भोजनपश्चात लगेचच अभ्यंग करू नये , १ ते 2 तासांनी करावे.

स्नान करण्यापूर्वी अभ्यंग करावे.

कमीत कमी १० ते २५ मिनिटांसाठी अभ्यंग करावे.

पश्चात गरम पाण्याने स्नान करावे.

 

कोणी करू नये?

खोकला, अजीर्ण, अपचन, ज्वर(ताप) असल्यास करू नये
.

वमन, विरेचन, बस्ति, नस्य आदी शोधनोपक्रम  केल्यानंतर अभ्यंग करू नये.

स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये अभ्यंग करू नये.

 

तीळ तेल, नारळाचे तेल, मोहरीचे तेल यांनी अभ्यंग केला जाऊ शकतो किंवा विशिष्ट व्याधी, व्यक्तीची प्रकृती यांनुसार त्यासाठी औषधी सिद्ध तेलाने केलेला अभ्यंग कधीही सर्वोत्तम!!


Dr. Suyogita Sawant(BAMS)



Comments

Popular posts from this blog

Covid-19 आणि आयुर्वेद

बाल झडने से पाये छुटकारा: घरेलू नुस्खे

दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार