दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार

दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार

देशभरामध्ये किती महिला आहेत ज्यांना त्यांच्या आजाराविषयी कल्पना नाहीय.. आणि ज्यांना कल्पना आहे त्या आजाराकडे दुर्लक्षच करत आहेत. असे आजार कधी कधी मोठ्या स्वरूपामध्ये समोर येतात आणि त्यासमोर हतबल व्हावे लागते.  आज आपण अशाच दुर्लक्षित आजाराविषयी बोलणार आहोत.

योनीमार्गातून स्त्रवणारा अनियमित आणि चिकट स्त्राव म्हणजे ' श्वेत प्रदर' .. (Leucorrhea) . कोणत्याही प्रकार च्या इन्फेक्शन चे कारण असू शकते. आणि त्यावर योग्य वेळी निदान आणि उपचार नाही झाले तर गंभीर व्याधी मध्ये रुपांतर होऊ शकते.  किंबहुना बहुतेक केसेस मध्ये वंधत्वा चे प्रमुख कारण श्वेत प्रदर असते.



Ø श्वेत प्रदर लक्षणे :

·        शरीरामध्ये आशक्तापणा वाढतो.

·        हातापायांमध्ये वेदना होणे

·        चिड चिडे पणा 

·        पोटऱ्यांमध्ये वेदना

·        शरीर गौरव (अंग जड वाटणे)

·        योनीमार्गा मध्ये खाज येणे , जळजळ होणे

·        कधी कधी इन्फेक्शन मुळे सूज देखील जाणवते

·        कंबरदुखी

Ø श्वेत प्रदर कारणे : 

महिलांमध्ये श्वेत प्रदर ची लक्षणे दिसताच त्या चिंतित होतात, त्यांना जाणून घ्यायचे असते की त्यांना का या सगळ्याचा सामना करावा लागतो आहे, आणि त्यांनी चिंतित होणे हे स्वाभाविक आहे 

१. पोषणाची कमतरता : भारतीय महिलांची जीवनशैली पाहता पोषणाची कमतरता जाणवतच असते. आज सरासरी ५०% महिलांमध्ये रक्ताची कमी आढळून येते. लोहाची कमतरता, जीवनसत्व ब ची कमी असणे, जीवनसत्त्व क आणि ड ची कमी असणे

२. बॅक्टरिया किंवा फंगल इन्फेक्शन : Trichomonas vaginalis, Gonorrhoea  हे सर्वात जास्त कारणीभूत असणारे bacteria    आहेत.असे आणखी काही fungus आणि bacteria    आहेत.

Ø मानसिक श्वेत प्रदर - म्हणजेच योनिमार्गा चा ph मेन्टेन ठेवण्यासाठी सुद्धा श्वेत स्राव योनीमार्गातून येतो.  गरोदर स्त्रियांमध्ये होणारा श्वेतस्त्राव     !!!!!!!

.

Ø अन्य करणे :

·       अति मैथुन

·       अत्याधिक उपवास म्हणजे पुन्हा पोषण कमी होणे

·       अधिक मेहनत

·       जास्त तिखट मसालेदार पदार्थ खाणे

·       रोगप्रतिकारशक्ती कमी असणे

·       वारंवार होणारे गर्भपात सुद्धा महत्त्वाचे कारण ठरते.

तर अशाप्रकारची लक्षणे दिसू लागली की त्याचे निदान होणे गरचेचे असते. आणि त्यासाठी जवळच्या वैद्याची भेट घेणे गरजेचे असते. पण त्यापूर्वी असे  काही  घरगुती उपचार आहेत ते तुम्हाला सुरवातीच्या काळात मदत करू शकतात.

१. आवळा : आवळा चूर्ण खूप महत्त्वाचे काम करते.

a. सकाळी आणि  संध्याकाळी  १-१ चमचा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे.

b. पिकलेले केळे १ आणि १ चमचा आवळा चूर्ण १ चमचा मधासोबत घेतल्याने सुद्धा खूप छान          आराम मिळतो.

२. जांभूळ : तसे जांभळाचे फळ मधुमेहींसाठी उपयुक्त असतेच पण जांभळाच्या झाडाची वाळलेली साल घेऊन त्याचे चूर्ण दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यात घेणे

३. अंजीर : २ - ३ सुखलेले अंजीर १ कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवून दुसऱ्यादिवशी सकाळी उपाशीपोटी खाणे.

४. खारीक : रोज रात्री झोपण्यापूर्वी २ खारका दुधामध्ये भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्याने रक्ताची कमी भरून येतेच शिवाय अशक्तपणा कमी होतो.

५. गावठी गुलाबाच्या पाकळ्या आणि डाळिंबाची सावलीमध्ये सुकलेली साल यांना पाण्यामध्ये उकळून उपाशीपोटी सेवन करावे.

६. तुरटी : तुरटी साधारण १ मग पाण्यामध्ये १५ मिनिट ठेऊन त्या पाण्याने योनीमार्ग स्वच्छ करावा.

७. दालचिनी, जिरे, अशोक वृक्षाची साल आणि वेलची यांचा काढा बनवून त्याच्या साहाय्याने योनीमार्ग स्वच्छ करावा.

८.  त्रिफळा : ( आवळा , हिरडा, बेहडा) याच्या काढ्याने देखील योनीमार्ग स्वच्छ केल्याने श्वेत प्रदरमध्ये आराम येतो. शिवाय या गोष्टी नियमित स्वरूपामध्ये केल्या गेल्या पाहिजे. योनिमार्ग नियमित कोरडा आणि स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

·        आहारामध्ये नेहमी हलके व लवकर पचणारे अन्न असावे.

·        गाईचे दूध, तूप यांचा वापर असावा. बकरी आणि म्हैशी चे दूध सुद्धा चालेल.

·        जुना तांदुळ, दलिया, यवागु ( पेज शितांसहित) मूग डाळ, मसूर डाळ, चना यांचा समावेश असावा.

·        पडवळ, पपई, पालक, द्राक्षे, डाळिंब, कोथिंबीर, दुधी भोपळा, नियमित स्वरूपामध्ये बीट रूट, गाजर, डाळिंब यांचा वापर करावा. आणि ऋतु प्रमाणे मिळणाऱ्या भाज्या आणि फळं यांचा समावेश आहारात असणे आवश्यक आहे.

·        नियमित स्वतः साठी १५ मिनिटे काढून योगासने , प्राणायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मनावर आलेला कामाचा ताण, थकवा निघून जातो आणि तुम्ही पुन्हा फ्रेश होता तुमच्या नवीन कामासाठी...!!

Dr. Suyogita(B.A.M.S.)


Comments

Dr Suyogita said…
please comment if you like this information & share

Popular posts from this blog

Covid-19 आणि आयुर्वेद

बाल झडने से पाये छुटकारा: घरेलू नुस्खे