वर्षा ऋतूचर्या
वर्षा ऋतूचर्या माघा पासून पौषापर्यंत दोन दोन महिन्याचे सहा ऋतू आहेत. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत. वर्षा, शरद आणि हेमंत ऋतूंनी मिळून दक्षिणायन होते. या काळात सूर्याचे बल कमी आणि चंद्राचे बल अधिक असते. दिवस लहान आणि रात्र मोठी असते. जुलै महिन्याच्या मध्यापासून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत वर्षा ऋतू असतो. गार वारा, पाऊस, अभ्रछादित आकाश यांच्या योगाने पृथ्वीवरील उष्णता कमी होते. वर्षा ऋतूमध्ये पाणी अम्ल विपाकी आणि गढूळ झाल्यामुळे त्यामुळे संधिवात, आमवात, वातरक्त हे वाताचे विकार बळावतात आणि भूक कमी झाल्यामुळे अजीर्ण, आम्लपित्त, अतिसार, उदरशूल असे रोग वाढतात. या काळात पित्ताचा संचय होत असतो परंतु बाहेरील गाराठ्यामूळे पित्त काही विकार उत्पन्न करीत नाही . त्यामुळे वर्षा ऋतू मध्ये नवीन धान्य वर्ज्य करण्यास सांगितले आहे. उष्णोदक - अग्निसंस्कारामुळे पाणी पचण्यास हलके होते. त्यामुळे गरम पाणी प्यावे. लघु भोजन - हलक्या पदार्थ...