Covid-19 आणि आयुर्वेद
2020 वर्षामध्ये जगभरात आलेल्या covid19 च्या साथीमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाले होते. भारतात झालेल्या लॉकडाउन मूळे अनेकांचे उद्योगधंदे, नोकऱ्या, भविष्यातील योजना जणू काही काळासाठी pause झाल्या आणि corona virus ची भीती सतावू लागली.
सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं तर माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये इतका व्यस्त झाला होता की सगळ्या गोष्टी कशा instant झाल्या पाहिजे कारण वेळही अपुरा पडत होता.
पण corona virus च्या निमित्ताने जे काही लाभले ते बहुमोलाचे होते.
असो तर मुद्दा हा आहे की या काळामध्ये आपण पाहिले की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर कंपन्यानी आपले products बाजारात आणले. पण कमी कालावधीत रोगप्रतिकार शक्ती अशी वाढणार नाही त्यासाठी नियमितता आणि सातत्य हवे आणि सोबत आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे काही मूल्यांचे संगोपनही झाले पाहिजे.
थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्येच्या अगदी विरुद्ध आपली जीवनपद्धती झाली आहे.
Seasonal मिळणारी फळे भाज्या आता 12 महिने मिळू लागल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाल्यावर कीड लागू नये , जास्त प्रमाणात उत्पन्न यावं म्हणून वापरले जाणारे chemicals खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराचे नुकसान करीत आहेत.
Corona virus वर विजय मिळवायचा असेल तर आयुर्वेदाची साथ ही हवीच! शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपल्याला जितके शक्य होईल तितके सेंद्रिय खतावर पिकवलेले भाजीपाला, फळे , धान्य यांचा वापर करा. धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी काही वेळ काढून योगासने प्राणायाम करून आपल्या फुफुसांची कार्यक्षमता वाढवता येते. नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्नाचा आहारात समावेश करा. ऋतूनुसार मिळणारी फळे भाज्या उपलब्ध असतील तर त्यांचा वापर करावा.
महत्वाचे सांगायच तर आपला योग्य आहार आणि विहार यावर आपली रोगप्रतिकार शक्ती अवलंबून असते.
सोबतीला आपल्या आयुर्वेदिक वनस्पती आहेतच जसे की गुडूची (गुळवेल), अश्वगंधा इ. आवळायुक्त च्यवनप्राश जो एखाद्या वैद्याने बनवला असेल असाच च्यवनप्राश खरेदी करा. कारण बाजारात मिळणारा च्यवनप्राश यामध्ये आवळ्याच्या जागी रताळे वापरलेले असते त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही होत.
वैद्याच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधे घेतली तर त्याचा फायदा नक्कीच होतो आणि आयुर्वेद तुमच्या सोबत असेल तर corona virus तुमचे काहीच बिघडवू शकत नाही.
Dr. Suyogita B.A.M.S.

Comments